नगरसेविका पतीचा बिटको कोविड रुग्णलयात धुडगुस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:02+5:302021-05-16T04:15:02+5:30
अचानक घडलेल्या या घटनेमुळे व जोरदार आवाज झाल्याने डॉक्टर, कर्मचारी , रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड ...
अचानक घडलेल्या या घटनेमुळे व जोरदार आवाज झाल्याने डॉक्टर, कर्मचारी , रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरून गेले होते अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे सुरुवातीला कुणालाच काही समजत नव्हते. आवाजामुळे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील रुग्ण व त्यांचे नातेवाईक गॅलरीत आले होते. काचेचे प्रवेशव्दार फुटल्याने रुग्णालय आवारात सर्वत्र काचांचा खच पडला होता. सदर घटना नाशिकरोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बिटको रुग्णालयाला पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला असला तरी ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी केवळ तीन सुरक्षा रक्षक प्रवेशद्वारावर हजर होते.
सदर घटनेची माहिती मिळताच महापौर सतीश कुलकर्णी, पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी भेट देऊन पाहणी केली . रुग्णालयाच्याा आत मध्ये सर्वत्र काचेचा थर पडलाा असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे बंद करून दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार येण्या-जाण्यासाठी सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नव्हती.
चौकट-
रुग्ण रुग्णालय सोडून गेले
अचानक घडलेल्या घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक भीतीपोटी रुग्णालय सोडून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
चौकट-
बिटको कोरोना सेंटरमध्ये काही दिवसापूर्वीच राजेंद्र ताजणे यांचे वडील उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले तेव्हा ताजणे यांना वडिलांसाठी ऑक्सिजन सिलेंडर खाजगी आणावे लागले होते. कोरोना बिटको सेंटरमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता तिप्पट-चौपट रुग्ण दाखल होते सर्वसामान्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक अक्षरशा हतबल झाले होते त्यातून या दुर्दैवी घटनेचा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे .
कोट-
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मित्र परिवार, प्रभागातील नागरिक, नातेवाईक, सहकारी कार्यकर्ते असे ७८ जण दगावले. बिटको रुग्णालयातील काळाबाजार , उडवाउडवीची उत्तरे हे दररोजचे झाले होते. माझे स्वत:चे वडील यांना ऑक्सिजन लावल्यावर तो सुरु कसा करायचा हे देखील कर्मचाऱ्यांना माहीत नसल्याने त्य क्षेत्रातील खासगी मित्रपरिवाराला बोलावून वडिलांचे ऑक्सिजन चालू केले. माझे वडील ॲडमिट असताना फक्त सुविधेचा अभाव व अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. माझ्या समोर अनेक सर्वसामान्य गोरगरिबांचे बळी गेले त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी व शासनाला समजण्यसाठी मी हे कृत्य केले. - राजेंद्र ऊर्फ कन्नु काशिनाथ ताजणे , संस्थापक मित्रमेळा