कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील पेट्रोलपंप चालकांचे धाबे दणाणले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दहा दिवस कडक निर्बंध लावण्यात आले. यादरम्यान जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा व ई-पासधारक वाहनांशिवाय अनावश्यक वाहनांना इंधनाची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत,परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करता तालुक्यातील अजंग येथील संतोष भाऊ पेट्रोल पंप व जाजूवाडी येथील बी.एस.पेट्रोलियम या पंपावर अनावश्यक वाहनांना इंधनाची विक्री करीत असताना आढळून आले.याप्रकरणी संतोष धर्मा जाधव (२३,रा.वडेल) व प्रवीण प्रल्हाद वाघ (३७,रा.जाजूवाडी ता.मालेगाव) यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.अधिक तपास वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विटोकर व शिरसाठ करीत आहेत.
दोन पेट्रोलपंप चालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:16 AM