दाभाडी परिसरात पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:13+5:302021-05-31T04:11:13+5:30

दोन दिवसांपासून मालेगाव शहर व ग्रामीण भागात दुपारच्या वेळेस पावसाळी वातावरण तयार होत आहे. शनिवारी दुपारच्या वेळेस अचानक वादळी ...

Crop damage in Dabhadi area | दाभाडी परिसरात पिकांचे नुकसान

दाभाडी परिसरात पिकांचे नुकसान

Next

दोन दिवसांपासून मालेगाव शहर व ग्रामीण भागात दुपारच्या वेळेस पावसाळी वातावरण तयार होत आहे. शनिवारी दुपारच्या वेळेस अचानक वादळी वारे वाहू लागले. त्यातच पावसानेही हजेरी लावल्यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर असणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. अचानक आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पिंपळगाव-दाभाडी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने, काही काळ वाहन चालकांना अडकून पडावे लागले होते. त्याचप्रमाणे, जळगाव, पिंपळगाव, रावळगाव, ढवळीविहिर, रिटायर्डवाडी येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे, अनेक शेतकऱ्यांचे कांदा, डाळिंब, आंबा, लिंबू आदी शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. या भागात शेताचे बांध फुटून पाणी वाहत होते, तर अनेक ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी होते.

रावळगावच्या दळवीवस्ती येथे वादळी-वाऱ्यामुळे आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक गरीब लोकांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे, तसेच काही ठिकाणी कांदा चाळींचेही पत्रे उडून गेल्याने पूर्णपणे कांदा पावसात भिजला असल्याने, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला असून, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

फोटो - ३० दाभाडी १ ते ३

===Photopath===

300521\30nsk_2_30052021_13.jpg~300521\30nsk_3_30052021_13.jpg~300521\30nsk_4_30052021_13.jpg

===Caption===

घरांचे नुकसान~कांदा चाळीचे नुकसान~शेतात सोचलेल्या पाण्याामुळे पिकांचे नुकसान

Web Title: Crop damage in Dabhadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.