खामखेडा : पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे खरीप पिकांची उशिरा पेरणी झाली आहे. आता ऐन धान्य भरण्याच्या वेळेस पावसाने हुलकावणी दिल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी चिंतेत पडले आहे. दरवर्षी मृगाच्या पावसावर शेतकरी खरीप पिकांची पेरणी करीत असल्यामुळे आॅक्टोबरपर्यंत पिके तयार होतात; परंतु चालू वर्षी सुरुवातीच्या दोन नक्षत्रांमध्ये पाऊस पडला नाही. नंतर आलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. खरिपाच्या पेरणीनंतरच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पिके जोरदार दिसत होती. पिंकाना रासायनिक खते देण्यात आली; परंतु पितृपक्ष आणि नवरात्रोत्सवात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे शेतातील ऐन धान्य भरण्याच्या स्थितीत पिके असताना पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
पिकांना पाण्याची गरज
By admin | Published: October 10, 2014 1:34 AM