त्र्यंबकेश्वर येथे बँकांमध्ये गर्दी

By admin | Published: November 11, 2016 10:54 PM2016-11-11T22:54:33+5:302016-11-11T22:54:31+5:30

त्र्यंबकेश्वर येथे बँकांमध्ये गर्दी

The crowd in banks at Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर येथे बँकांमध्ये गर्दी

त्र्यंबकेश्वर येथे बँकांमध्ये गर्दी

Next

 त्र्यंबकेश्वर : येथील राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्थांमध्ये आज लाखो रुपयांची उलाढाल झाली. सकाळपासूनच बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. त्यातही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. बँक कर्मचाऱ्यांना उसंत नव्हती. तथापि प्रत्येक कर्मचाऱ्याने सहकार्याच्या भावनेने ग्राहकांना मदत केली. अर्थात भारतीय स्टेट बँकेसारख्या बँकेत मात्र दारबंद करून आतील ग्राहकाचे काम झाल्यावरच नवीन ग्राहकाला आत घेतले जात होते.
त्र्यंबकेश्वर शहरात भारतीय स्टेट बँक, देना बँका, बँक आॅफ महाराष्ट्र, सिंडीकेट बॅँक, एचडीएफसी बँक आदि राष्ट्रीयकृत बँका आहेत तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नामको बँक, घोटी मर्चण्ट्स को-आॅप. बँक या नागरी बँका तर कैलास नागरी सहकारी पतसंस्था लि., कै. देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्था, कै. अण्णासाहेब लोणारी नागरी सहकारी पतसंस्था लि., व दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था अशा आर्थिक संस्था आहेत. तथापि बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, देना बँक, सिंडीकेट बँक आदि बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी एकच झाली होती. त्यात नोटा बदलून घेणारे अगदी नगण्य लोक होते तर खात्यांमध्ये पैसे जमा करणारे व कर्ज खात्यात जमा करणाऱ्यांचा भरणाही दिसून येत होता. राष्ट्रीयीकृत बँका वगळून अन्य बँका, पतसंस्थांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात नव्हत्या. कर्ज खात्यात व बचत खात्यात पैसे जमा केल्याचे समजते. (वार्ताहर)

Web Title: The crowd in banks at Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.