ॲंटिजन चाचणीने गर्दीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:46 AM2021-05-15T00:46:38+5:302021-05-15T00:46:59+5:30

लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून गुरुवारपासून मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये अँटिजन चाचणी सक्तीची करण्यात आली असून, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. 

Crowd control by antigen testing | ॲंटिजन चाचणीने गर्दीवर नियंत्रण

ॲंटिजन चाचणीने गर्दीवर नियंत्रण

Next

नाशिक :  लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून गुरुवारपासून मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये अँटिजन चाचणी सक्तीची करण्यात आली असून, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. 
 मनपाने शुक्रवारी म्हसरूळ, मायको दवाखाना, हिरावाडी उपआरोग्य केंद्र येथे लसीकरण करण्यापूर्वी अँटिजन चाचणी सुरू केली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिक गर्दी करत असल्याने नागरिकांमध्ये रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वाद होतात. गर्दीत कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना चाचणी  करणे बंधनकारक करण्यात आले. 
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत झाली आहे. चाचणीचा अहवाल नकारात्मक आला तर लस घेता  येईल व चाचणी सकारात्मक आल्यास रुग्णाला मेरी कोविड सेंटर येथे उपचारासाठी रवाना केले जाणार आहे. इंदिरा गांधी 
रुग्णालयात लसीकरण करण्यासाठी आलेल्या २०० नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली त्यात तीन जण कोरोनाबाधित आढळले.  या रुग्णांना उपचारार्थ 
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Crowd control by antigen testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.