सुट्टीची पर्वणी साधत  गडावर भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:13 AM2018-03-31T00:13:42+5:302018-03-31T00:13:42+5:30

चैत्र यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगदेवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असून, सलग तीन दिवस सुट्टी आल्याने गडावर भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. आज तीन लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले.

 The crowd of devotees gathering on the fort on holiday | सुट्टीची पर्वणी साधत  गडावर भाविकांची गर्दी

सुट्टीची पर्वणी साधत  गडावर भाविकांची गर्दी

googlenewsNext

वणी : चैत्र यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगदेवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असून, सलग तीन दिवस सुट्टी आल्याने गडावर भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. आज तीन लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. रामनवमी ते हनुमान जयंती अशा उत्सव कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. विशेषत: खान्देशवासीयांची मान्यता यात्रोत्सव कालावधीत देवीचे दर्शन घेण्याची असते. त्या पारंपरिक भावनेनुसार प्रतिवर्षी भाविक हजेरी लावतात. गुरुवारी सकाळपासूनच गडावर भाविकांची रिघ लागली होती. सुमारे तीन लाखांवर भाविकांनी आतापर्यंत भगवतीचे दर्शन घेतले असून, नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या अंतरासाठी दर दहा मिनिटाला एसटी बसची व्यवस्था राज्य  परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे.  नवस फेडण्यासाठी पायी येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे गडावर गर्दी वाढली आहे. दर्शनासाठी बाºया लावण्यात आल्या असून, भगवतीचा जयघोष करत भाविक भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहेत.  महाराष्ट्रातील जळगाव, धुळे नंदुरबार, भुसावळ, पुणे, नगर, नाशिक व औरंगाबादबरोबरच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यातील भाविकांनीही दर्शनासाठी हजेरी लावली.  दुपार साडेचार वाजेच्या सुमारास दरेगाव येथील मानकरी गवळी कुटुंबीयांची ध्वजासहीत शोभायात्रा मुख्य कार्यालयापासून ते पहिल्या पायरीपर्यंत काढण्यात आली. ध्वजपूजन व सवाद्य मिरवणुकीत सप्तशृंगी मातेच्या नावाचा गजर करण्यात आला.

Web Title:  The crowd of devotees gathering on the fort on holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.