उन्हाळा वाढताच आईस्क्रीम पार्लरवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:26+5:302021-03-13T04:25:26+5:30

शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली नाशिक : रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शहराच्या विविध ...

Crowds at the ice cream parlor as summer progresses | उन्हाळा वाढताच आईस्क्रीम पार्लरवर गर्दी

उन्हाळा वाढताच आईस्क्रीम पार्लरवर गर्दी

googlenewsNext

शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली

नाशिक : रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शहराच्या विविध भागातील भाजी बाजारातील उर्वरित भाजीपाल्याची आणि शिळे अन्न मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकले जात असल्याने पुन्हा शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

समांतर महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे

नाशिक: नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असे खड्डे पडले असून, त्यात वाहन आदळण्याच्या भीतीने नागरिक खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करतात. मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. मुंबई नाका ते आडगाव नाका मार्गावर अशाप्रकारे अनेक खड्डे आढळून आले असल्याने या मार्गाची डागडुजी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

द्वारका चौकात कोंडी कायमच

नाशिक : वाहतुकीत बदल करण्यात आल्यानंतरही द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. धुळे, मालेगावकडून येणाऱ्या बसेस कन्नमवार पुलावरून द्वारका चौकात येताना सर्व्हिस रोडने येतात. त्यामुळे हॉटेल द्वारकानजीकच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागत आहे. चौकात वाहतूक पोलीस उभे असूनही त्यांच्याकडून

पडक्या इमारती बनल्या मद्यपींचा अड्डा

नाशिक : शहरातील विविध भागात असलेल्या पडक्या इमारती, जीर्ण बांधकामांमुळे रहिवासीविरहीत परिसराचा ताबा मद्यपींनी घेतला आहे. रात्रीच्या सुमारास येथे मद्यपींचा वावर वाढला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत येथे अनेक मद्यपींचा येथे धिंगाणा सुरू असतो. याप्रकरणी संबंधित विभागातील कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गंजमाळ सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार

नाशिक : जुने नाशिक परिसरातून येणारे दुचाकीस्वार गंजमाळ येथील सिग्नलवर न थांबता नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. शहरातील हा महत्त्वाचा सिग्नल असून, सातत्याने वर्दळ सुरू असते. अशावेळी अनेक दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत सिग्नलकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या चौकात वाहतूक पोलीस दिसत नसल्यामुळे तर बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच फावत आहे. पोलिसांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सिडकोतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

नाशिक : शहरातील सिडको भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

वाढत्या उन्हाने नागरिक त्रस्त

नाशिक: मार्च महिन्याच्या सकाळी अकरापासूनच उन आणि वातावरणातील उकाडा वाढू लागल्याने नागरिक त्रस्त होऊ लागले आहेत. वाढत्या उन्हाने दुपारी घराबाहेर पडणे शक्य होईनासे झाले आहे. तर निर्बंधामुळे सायंकाळी सातनंतर घराबाहेर पडून कामे करणे शक्य नसल्याने नागरिकांना दुपारीच घराबाहेर पडण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.

Web Title: Crowds at the ice cream parlor as summer progresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.