शालेय समितीचे सदस्य संजय वारूळे यांच्या हस्ते कला महोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य विकसीत व्हावे यासाठी वारूळे यांनी कार्यक्रमास एक हजार रूपयांची देणगी दिली. इयत्ता ५ वी ते ९ वीतील १०२ विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपला कलाविष्कार सादर केला. यात प्रामुख्याने नाट्य, मिमिक्री, गायन, वादन, कोळीगीत, लावणी, देशभक्तीपर गीत आदी नृत्यांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून ए. पी. गाडेकर, यु. के. मुंढे, एस. यु. उंबरे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शिक्षणासोबतच त्यांच्या अंगी असलेले नानाविध कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपिठ उपलब्ध व्हावे यासाठी विद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते म्हणूनच दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक डी. बी. गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख जी. डी. गायकवाड यांनी केले. यावेळी वाय. एम. मुर्तडक, डी. एस. जगताप, के. एम. गिते, वाय. एस. गायकवाड, व्ही. एस. हजारे, व्ही. जी. वळवी, एम. पी. अहिरे, ए.एन. डौरे, एस. एम. साळूंके, ए. के. बैरागी, सुनिल दळवी, आर. डी. बेंडकोळी आदींसह ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांगरी विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 6:05 PM