शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी

By admin | Published: November 11, 2016 10:46 PM

नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी

ओझर : सकाळपासून लांबच लांब रांगाओझर : केंद्र सरकारने रद्द केलेल्या ५०० व १०००च्या नोटा बदली करून घेण्यासाठी ओझरकरांनी प्रत्येक बँकेत तोबा गर्दी केली असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. येथे बँक आॅफ महाराष्ट्र, बडोदा बँक, एस बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, नाशिक मर्चण्ट बँक तसेच स्थानिक सहकारी बँका आणि पतसंस्थेंमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. बुधवारी अचानक पुकारलेल्या बंदमुळे काहींची मात्र तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळपासून लोकांनी बँकांसमोर रांगा लावून गर्दी केली होती. खात्यात पैसे भरायला कुठलेही निर्बंध नसून फक्त पैसे काढताना मात्र चार हजारची मर्यादा दिल्याने याचा थेट परिणाम बाजारामध्ये दिसून आला आहे. पोस्ट आॅफिसमध्ये शुक्रवारी मात्र पैसे संपल्यामुळे काही लोकांना परत जावे लागले असून, काही सहकारी आणि राष्ट्रीय बँकांमध्येदेखील पैशांचा तुटवडा झाला. यात गडबड गोंधळ मात्र कुठे झालेला दिसला नाही तरीदेखील सामान्य माणसाला चार हजारासाठी मात्र चार पाच तासाची प्रतीक्षा करावी लागते आहे.महामार्गावरील पेट्रोल पंपवाल्यांना मात्र तोंड देता देता नाकी नव आले असून, सुटे करण्याच्या बहाण्याने अनेक जण हजारची नोट देऊन शंभरचे पेट्रोल टाकताना आढळले. यामुळे मात्र काही ठिकाणी तर बाचाबाचीदेखील झाली. हॉटेलमध्येदेखील हीच परिस्थिती दिसून आल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडीवाल्यांना मात्र जेवायची पंचायत झाली कारण एकही हॉटेल अथवा ढाबा त्यांच्याकडून पाचशे आणि हजारच्या नोटा घेत नव्हते. काही व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाही, अशी पाटीदेखील लावली आहे. सामान्य माणसाची हिशोब करताना मात्र अजून दिवस हेळसांड होणार आहे. (वार्ताहर)