नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानातंर्गत ‘सायकल शेअरिंग’ या अनोख्या प्रकल्पाची नाशिक शहरात सुरुवात करण्यात आली होती, पण दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे सायकल स्टेशन पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. महापालिकेने ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सायकल स्टेशनला पाण्याचा फटका बसला आहे.मनपा व टाटा कन्सल्टन्सीच्या सहकार्याने शहरातील अनंत कान्हेरे मैदान, मॅरेथॉन चौक, प्रमोद महाजन गार्डन, कुसुमाग्रज स्मारक, पाथर्डी फाटा, उपनगर, नाशिकरोड आदी ठिकाणी ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत सायकल शेअररिंग या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती, पण शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आहे. त्यामुळे महामार्गांसह अनेक ठिकाणचे परिसर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले. त्यात सायकल शेअरिंगच्या उपक्रमातून लावण्यात आलेले सायकल स्टेशन पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे, तर त्या स्टेशनवरील काही सायकली पाण्याच्या प्रवाहात दूरपर्यंत वाहून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प तूर्तास पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.
‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:48 AM