दादासाहेब फाळके स्मारकाचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:51 PM2020-10-02T23:51:47+5:302020-10-03T01:02:07+5:30

नाशिक- भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्याच्या स्मारकाला आलेली अवकाळा थांबण्याची चिन्हे आहे. गेल्या काही वर्षात भग्नावस्थेत रूपांतरीत होत असलेल्या या स्मारकाला आता नवे रंग रूप देण्यात येणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात तब्बल दहा कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या स्मारकात फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी देखील तब्बल पाच कोटी रूपयंची तरतूद महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.

Dadasaheb Phalke memorial will be transformed | दादासाहेब फाळके स्मारकाचे रूपडे पालटणार

दादासाहेब फाळके स्मारकाचे रूपडे पालटणार

googlenewsNext
ठळक मुद्देअर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद: महापौरांनी केली पाच कोटींची तरतूद

नाशिक- भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्याच्या स्मारकाला आलेली अवकाळा थांबण्याची
चिन्हे आहे. गेल्या काही वर्षात भग्नावस्थेत रूपांतरीत होत असलेल्या या स्मारकाला आता नवे रंग रूप देण्यात येणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात
तब्बल दहा कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या स्मारकात फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी देखील तब्बल पाच कोटी रूपयंची तरतूद महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.
नाशिक महापालिकेने १९९९-२००० मध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे स्मारक साकारले आहे. याठिकाणी चित्ररूपाने त्यांचा जीवनपय साकारला आहे. याशिवाय संगीत कारंजे, उद्यान अशी आकर्षक रचना असल्याने सुरूवातीच्या काळात हे स्मारक नाशिककरांचे आणि पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले होते. याठिकाणी चित्रनगरी स्थापन करण्याची देखील वेळोवेळी तयारी करण्यात आली होती. मात्र, नंतर महापालिकेचे दुर्लक्ष होत गेल्याने स्मारकाची रया गेली. उद्याने सोडली तरी कारंजा आणि अन्य वास्तुंची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्याने अपेक्षीत उत्पन्नापेक्षा कैकपटीने खर्च वाढला आहे. मात्र आधी महापौर सतीश कुलकर्णी आणि नंतर आयुक्त कैलास जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन स्मारकाचे नुतनीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी ७ फेबु्रवारीस भेट दिल्यानंतर स्मारकाच्या नुतनीकरणाबाबत सूचना करताना त्यात कला क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना
जाणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात फाळके स्मारकासाठी वेगळी तरतूद
नसल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षात फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पाच कोटी तर फाळके स्मारक आणि बुध्द स्मारक या दोन्ही
स्मारकांचे नुतनीकरण करण्यासाठी दहा कोटी रूपयांची तरतूद करण्याची सूचना देखील केली होती. आता आयुक्त कैलास जाधव यांनी स्मारकाला भेट दिल्याने फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी स्मारकाचे नष्टचर्य संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या स्मारकात चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा पुतळा बसवावा अशी मागणी फिल्म सोसायटीने स्मारक बांधण्यापूर्वीच केली होती. परंतु
महापालिकेने आपल्या परीने काम करताना पुतळ्याचा विषयच वगळून टाकला होता. त्यानंतर आता तब्बल वीस वर्षांनी पुतळ्याचा विषय चर्चेत आला आहे.

 

 

Web Title: Dadasaheb Phalke memorial will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.