साकोऱ्यात लोकवर्गणीतून बांधलेला बंधारा फुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 01:27 AM2019-08-13T01:27:09+5:302019-08-13T01:27:40+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

A dam built by a census in Sakor! | साकोऱ्यात लोकवर्गणीतून बांधलेला बंधारा फुटला !

साकोऱ्यात लोकवर्गणीतून बांधलेला बंधारा फुटला !

Next
ठळक मुद्देलाखो रुपयेपाण्यात : निकृष्ट बांधकाम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सन २०१० मध्ये या परिसरातील २० शेतकऱ्यांनी एकत्रित येत येथे बंधाºयाच्या मंजुरीसाठी ८० हजार रु पये जमा केले होते. त्या अनुषंगाने आमदार निधीतून ३० लाख रुपये खर्च करून कोल्हापूर टाइप १३ फूट उंचीचा बंधारा बांधण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकºयांना या पाण्याचा फायदा झाला. मात्र पाण्याची वाढती मागणी व गत दोन वर्षांपूर्वी पडलेली दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकºयांनी या पाण्याकडे धाव घेऊन पुन्हा २० शेतकºयांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये लोकवर्गणी जमा करून या बंधाºयाची उंची वाढवून या पाण्याचे वाटेकरी झाले. मात्र या बंधाºयाला गळीत लागून तो फुटला.हजारो लिटर पाणी वायाबंधाºयाच्या वरच्या भागात वनविभागाच्या हद्दीत
एक नवीन माती बंधारा बांधण्यात आला. मात्र
एकच वर्षात तो बंधारा फुटल्याने नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा सन २०१६ मध्ये २० शेतकºयांनी एकत्र येऊन प्रत्येकी दोन लाख रुपये एकूण ४० लाख रु पये
जमा करून तब्बल ३२ फूट उंचीच्या बंधाºयाचे काम करण्यात आले. त्यामुळे मागे दोन किमी अंतरावर पाण्याचा साठा वाढला होता. त्यामुळे नवीन वीस शेतकºयांसह एकूण ८० शेतकºयांना या पाण्याचा लाभ होणार होता.
गतवर्षी वरील ८० शेतकºयांपैकी काही जणांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करून घेत. मात्र यावर्षी निव्वळ रिमझिम पावसात या बंधाºयाला गळती लागून बंधारा फुटल्याने साठलेले हजारो लिटर पाणी वाहून गेल्याने नवीन वीस शेतकºयांनी दोन - दोन लाख रु पये लोकवर्गणी देऊनही यांच्या शेतशिवारात पाण्याचा एक थेंबही न पोहचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. व्यवहारात गोंधळ होऊनदेखील सर्व तोंडावर बोट आणि हाताची घडी घालून बसले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: A dam built by a census in Sakor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण