अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 07:01 PM2020-12-14T19:01:46+5:302020-12-14T19:02:22+5:30

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या खराब हवामान व अवेळी पावसामुळे शेतीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Damage to agriculture due to unseasonal rains | अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान

अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान

Next
ठळक मुद्देरब्बी पिकामध्ये हरबरा, गहू, मसूर यांची अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या खराब हवामान व अवेळी पावसामुळे शेतीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या परिसरात ढगाळ वातावरण आहे. दिवसभर धुक्याचे साम्राज्य, कोंदट वातावरण, सूर्यदर्शन नाही. यामळे सर्वत्र नैराश्य पसरलेले आहे. त्यातच रविवारी रात्री व सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी अवेळी पडलेल्या रिमझिम व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे.
यावर्षी अवेळी पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यावर्षी निम्म्याहून अधिक प्रमाणात उत्पादन घटले आहे. त्यातच बाजारभाव कमी असल्याने शेतकरी तोट्यातच आहे.
या वर्षी भातसोंगणीतच पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. परिसरातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे मांजरगाव, वासाळी, खेड, सोनोशी, बारशिंगवे, टाकेद, अडसरे, धामणगाव, भरवीर या सर्वच परिसरात दुषित वातावरण तयार झाले आहे.

रब्बी पिकामध्ये हरबरा, गहू, मसूर यांची अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तसेच बागायत क्षेत्रामध्ये बटाटा टॉम्याटो, फ्लावर यांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. हरबरा, तूर पिकावर रोग पसरून ती वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ज्यांनी नुकतीच पेरणी केली आहे, त्यांना दुबार पेरणी करावी लागेल. यामुळे ढगाळ वातावरण व खराब हवामानामुळे सर्वांचेच नुकसान होईल असे शेतकरी बोलत आहेत.

Web Title: Damage to agriculture due to unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.