खामखेडा येथे पावसामुळे घराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:51 PM2019-08-09T14:51:13+5:302019-08-09T14:51:54+5:30
खामखेडा : येथे रिमझिम पावसामुळे घराची व पुराच्या पाण्याने नुकसान झाल्या पिकाची पाहणी करण्यात येऊन पंचनामे करण्यात आले.
खामखेडा : येथे रिमझिम पावसामुळे घराची व पुराच्या पाण्याने नुकसान झाल्या पिकाची पाहणी करण्यात येऊन पंचनामे करण्यात आले.
गेल्या आठ दिवसापासून खामखेडा परिसरात रिमझिम पाऊस सुरु असल्याने या रिमझिम पावसामुळे गावातील मातीच्या घराची पडझड झाली. तेव्हा खामखेडा येथील तलाठी अंबादास पुरकर व ग्रामसेवक व्ही व्ही सोळशे यांनी पडलेल्या घराची पाहणी करून पंचनामे करण्यात केले. गिरणा व पुनद नदीच्या परिसरात पूर आला होता.नदीच्या पुराचे पाणी नदीकाठालगतच्या जमिनीतील पिकात गेल्याने पिके भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरकर यांनी नदीच्या पुरामुळे नदीकाठालगतच्या जमिनीतील नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून पंचनामा केला.