विंचूरला दहा कांदा शेडचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:12+5:302021-05-31T04:11:12+5:30
बाजार समितीत कांदा साठवणूक करून उरलेला कांदा तसाच पडून आहे. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ ...
बाजार समितीत कांदा साठवणूक करून उरलेला कांदा तसाच पडून आहे. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. आधीच लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद आहेत. त्यामुळे कांदा झाकण्यासाठी ताडपत्री मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे. सलग दोन दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसाने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार असला तरी येथील कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेडचे नुकसान झाल्याने व्यापारी वर्गावर अर्थिक संकट ओढावलेले आहे. या वादळी पावसात गजानन ट्रेडिंगचे दोन शेड, राजेश्री ट्रेडिंग , कदम अँड सन्स , आयजा ट्रेडिंग, कृष्णा ट्रेडिंग, आर.टी ट्रेडिंग, मेडोना एक्सपोर्ट, हरिओम टेडर्स यांच्या शेडचे नुकसान झाले. दरम्यान, राजेश्री ट्रेडिंग या कांद्याच्या शेडखाली मेंढ्या आश्रयाला थांबलेल्या होत्या. त्यावेळी वादळाने शेड पडल्याने शेड खाली दाबून त्यांचा मृत्यू झाला.
फोटो - ३० विंचूर रेन
विंचूरला झालेल्या वादळी पावसामुळे पडलेले कांदा शेड.
===Photopath===
300521\30nsk_43_30052021_13.jpg
===Caption===
फोटो - ३० विंचूर रेन विंचूरला झालेल्या वादळी पावसामुळे पडलेले कांदा शेड