वणी/पांडाणे : सप्तमी व सातव्या माळेला शनिवारी गडावर सप्तशृंगीदेवीच्या चरणी सुमारे दोन लाख भाविक नतमस्तक झाले असुन अंतिम सत्रात भाविकांच्या उपस्थितीमुळे यात्रोत्सवाला उत्साहाचे उधान आले आहे.शनिवारी सकाळपासुन गडावर भाविकांची गर्दी होती. सकाळी आठ वाजेपासुन दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या तर फर्नक्युलर ट्रॉली भागातही भाविकांनी रांगा लावल्या होत्या.शुक्र वारी गडावर जोरदार पाऊस झाला होता व दोन एस टी बसचा अपघातही झाला होता, अशा स्थितीत व्यावसायिक काळजीत पडले होते. सप्तश्रृंगी मातेची महापुजा व आरती न्यासाचे विश्वस्त रावसाहेब शिंदे व के के पाटील यांनी केली. व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत व पुजारी आदी उपस्थित महाआरती करण्यात आली. सातवी माळ असल्यामुळे सप्तशृंगी देविला हिरवा रंगाचा अकरा वारी शालूने देविचे रु प आदीक खुलून दिसत होते. भगवतीला हिरे मुकूट चा सोन्याचा मुकूट , गळ्यात मोहण माळ , कुहीरी हार , मंगळसुत्र , कर्णफुले, नथ , सोन्याचा कंबर पट्टा, पायात सोन्याचे तोडे , सुवर्ण पादुका असे अलंकारांनी भगवतीचे रु प खुप देखणे व खुलून दिसत होते.
दोन लाख भाविकांकडून सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 3:56 PM