निघालो घेऊन दत्ताची पालखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:00 AM2018-03-08T02:00:09+5:302018-03-08T02:00:09+5:30

मौजे सुकेणे : यात्रेच्या पहिल्याच दिवशी पाऊण लाख भाविकांची हजेरीदत्त यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभकसबे सुकेणे : रंगाची उधळण, न्हाऊन निघालेले भाविक अन् भक्तीचा जल्लोष अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोउत्तर रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे पाऊण लाख भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला आहे.

Datachi Palqi takes you away ... | निघालो घेऊन दत्ताची पालखी...

निघालो घेऊन दत्ताची पालखी...

Next
ठळक मुद्देदत्त यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभमौजे सुकेणे : यात्रेच्या पहिल्याच दिवशी पाऊण लाख भाविकांची हजेरी

कसबे सुकेणे : रंगाची उधळण, न्हाऊन निघालेले भाविक अन् भक्तीचा जल्लोष अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोउत्तर रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे पाऊण लाख भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला आहे.
रंगाची यात्रा म्हणून सर्वदूर परिचित असलेली व राज्यातील लाखो महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्ता यात्रोत्सवास रंगपंचमीपासून प्रारंभ झाला. पालखी पुढे उधळणारा रंग हा भाविक प्रसाद म्हणून अंगावर घेतात, अशी येथे श्रद्धा आहे. त्यामुळे हा पालखी सोहळा पाहण्यासाठी व नवस पूर्तीसाठी याठिकाणी राज्यभरातून भाविक दाखल होतात.
यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महंत मनोहरशास्त्री सुकेणेकरबाबा, पूज्य अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य बाळकृष्ण सुकेणेकर, पूज्य राजधरराज सुकेणेकर, पूज्य गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांच्या हस्ते देवास विडा अवसर करण्यात आला.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी पूजन माजी आमदार दिलीप बनकर, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, दामोदर मानकर, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, दीपक शिरसाठ, दत्ताजी गायकवाड, सरपंच वृषाली बाळासाहेब भंडारे, उपसरपंच नंदराम हांडोरे, माजी सरपंच सुरेखा विलास गडाख, पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या हस्ते झाले. यावेळी भगवान भंडारे, अशोक निकम, शांतिलाल जैन, संग्राम मोगल, रावसाहेब भंडारे, विलास गडाख, रामराव भंडारे, विराज भंडारे, डी.बी. मोगल, ग्रामविकास अधिकारी शीतल सनेर, पंचायत समिती सदस्य रत्ना संगमनेरे, किरण देशमुख, सचिन मोगल, माधवराव मोगल, रामराव मोगल आदी उपस्थित होते.
दुपारी साडेतीन वाजता मिरवणुकीस पूर्वमहा-प्रवेशव्दारापासून झाला.भक्तीचा जल्लोष दरवर्षाप्रमाणे लाखो भाविक, भक्तीचा जल्लोष आणि रंगांची उधळण, डीजेवर तालावर थिरकणारी तरुणाई आणि असा उत्साह पालखी सोहळ्यात पहावयास मिळाला. रात्री उशिरा पालखीचे पुरातन विसावा पारावर आगमन झाले. मध्यरात्री सनईच्या मंजूळ स्वरात पालखी परतीच्या प्रवासाला लागली. भल्या पहाटे भाविकांनी परतीच्या मार्गावर सडा-रांगोळ्या घालत पालखी पूजन केले. रंगपंचमी खेळण्याची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या मौजे सुकेणेची यात्रेला यात्रेकरूंचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. यात्रेच्या दुसºया दिवशी बुधवारी (दि. ७) भाविकांची गर्दी होती. सायंकाळी ७ वाजेनंतर यात्रेत स्थानिक व परिसरातील नागरिकांची विशेष गर्दी होती.

Web Title: Datachi Palqi takes you away ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर