सटाणा : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबराच्या नाममंत्र घोषणाने सटाणा शहरासह परिसरात मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली.शहरातील श्री स्वामी समर्थ अध्यात्म्कि सेवा केंद्रात श्री गुरू चरीत्र पारायण सप्ताहाचे अयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ अध्यात्म्कि सेवा केंद्रात दुपारी ठिक १२.३९ वाजता दत्त जन्म साजरा करण्यात आला. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा गाभारा फुलांनी सुशोभित करण्यात आला. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख किरण नांदरे, अशोक चव्हाण, उखा सोनवणे, अरूण इंगळे, मुकेश जाधव, पंडीत सोनवणे, राकेश येवला, अनिल सोनवणे आदी उपस्थित होते. तर सटाणा बसस्थानक, नेहरु रोड, उपासनी रोड, कोर्टागल्ली, पंचायत समिती आवार, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती, देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर आवारातील श्री दत्त महाराजांच्या मंदिरात भाविकांनी श्री दत्त महाराजांचे दर्शनासाठी गर्दी केली होती.दत्त जयंती निमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात होते. श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात श्री गुरूचरित्रातील चौथ्याचे अध्यायाचे वाचन व प्रवचन कमलाकर कदम यांनी केले. तसेच केंद्राचे वतीने कोवीड काळात सटाणा पोलिस स्टशेनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, डॉ. दिग्वीजय शहा, समको चेअरमन कैलास येवला, मनोज निकम या योध्दा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला व पुरूष भाविकांनी दर्शनाठी गर्दी केली होती.
सटाण्यात दत्त जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 5:50 PM
सटाणा : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबराच्या नाममंत्र घोषणाने सटाणा शहरासह परिसरात मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली.
ठळक मुद्देकेंद्रात श्री गुरू चरीत्र पारायण सप्ताहाचे अयोजन