चांदवडच्या कोविड सेंटरबाहेर खंडाळवाडीतील रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:14 AM2021-04-22T04:14:42+5:302021-04-22T04:14:42+5:30

वडनेरभैरवपासून दीड किलोमीटर अंतरावरील खंडाळवाडी येथील अरुण उत्तम माळी (३५) हा मंगळवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या ...

Death of a patient in Khandalwadi outside Kovid Center in Chandwad | चांदवडच्या कोविड सेंटरबाहेर खंडाळवाडीतील रुग्णाचा मृत्यू

चांदवडच्या कोविड सेंटरबाहेर खंडाळवाडीतील रुग्णाचा मृत्यू

googlenewsNext

वडनेरभैरवपासून दीड किलोमीटर अंतरावरील खंडाळवाडी येथील अरुण उत्तम माळी (३५) हा मंगळवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पत्नी सुरेखा हिच्यासोबत चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर येथे तब्येत बरी नसल्याने आला. रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने डॉक्टरांनी तातडीने बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याची ऑक्सिजन लेव्हल अगदी ३० ते ३५ होती. त्यामुळे सदरचा रुग्ण कोविड सेंटरच्या पायरीजवळ कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात स्ट्रेचरवर नेऊन डॉ. सोनवणे यांनी तपासणी केली असता त्याची प्राणज्योत मालवली होती. सदर रुग्ण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आजारी असल्याचे परिसरात बोलले जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुलगी आरती व मुलगा आदित्य असा परिवार आहे.

कोट...

कोरोना रुग्णाने वेळेत रुग्णालयात येऊन तपासणी व औषध उपचार घेतले तर बरा होतो. मात्र सदर रुग्ण अति गंभीर अवस्थेत आल्यामुळे हा प्रकार घडला. यासाठी थोडी लक्षणे असताना रुग्णांनी आजार न लपविता वेळेत औषध उपचार घेणे गरजेचे आहे .

- डॉ. सुशीलकुमार शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी

Web Title: Death of a patient in Khandalwadi outside Kovid Center in Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.