नाशिक : संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विद्रोही साहित्य संमेलन संपर्क कार्यालय म्हणजे, शेकाप कार्यालयात रविवारी (दि.२१) संमेलन संयोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्घाटक, अध्यक्ष, संमेलन नियोजन, निधीसंकलन व संमेलनस्थळ आदी विविध विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने उद्घाटन सोहळ्यासाठी पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांचा निर्णय दोन दिवसांत अपेक्षित असल्याची माहिती संमेलन समितीकडून उपस्थितांना देण्यात आली. त्याचसोबत संमेलन स्थळासंदर्भातही यावेळी सविस्तर चर्चा झाली. सुमारे तीन हजार लोक बसण्याची व्यवस्था व पन्नास बुक स्टॉलची सुविधा उपलब्ध होईल, अशी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी ठिकाणांची पाहणी सुरू असून दोन दिवसांतच संमेलनस्थळ जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संमेलन निधी संकलनासाठी ‘मूठ भर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी’ या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून नाशिकरोड येथून होणार असल्याचेही सांगण्यात आले. बैठकीला संमेलनाच्या मुख निमंत्रक प्रा. इंदिरा आठवले, किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवने, गणेश उन्हवने, व्ही.डी.जाधव, प्रभाकर धात्रक, मुख्य विश्वस्त ॲड.मनीष बस्ते, मुख्य संयोजक राजू देसले, राकेश वानखेडे, नितीन भुजबळ, नानासाहेब पटाईत, यंशवत बागुल, अर्जुन बागुल, संजय उन्हवने, देवीदास हजारे, अरुण शेजवळ, विनायक पाठारे, रविकांत शार्दुल, दादाजी बागुल, अनिल आठवले, सुशीलकुमार पवार आदी उपस्थित होते.
विद्रोही संमेलनस्थळ, उद्घाटकांविषयी दोन दिवसांत होणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:55 AM
संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
ठळक मुद्देसंपर्क कार्यालयात बैठक : अध्यक्ष निवड, निधी संकलनावरही चर्चा