चाचण्या कायम ठेवूनही रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:59 AM2021-05-15T00:59:33+5:302021-05-15T00:59:53+5:30

एप्रिल महिन्यात कमालीचा पॉझिटिव्हिटी दर गाठलेल्या कोरोनाने अचानक वाढलेली रुग्णसंख्या व त्या प्रमाणात होत असलेले मृत्यू पाहता, सदरची लाट आटोक्यात येण्याबाबत व्यक्त होणाऱ्या शंकांना आता पूर्णविराम मिळण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. सरासरी दररोज १५ हजार संशयित रुग्णांची चाचणी केली असता त्यातून दोन ते अडीच हजार रुग्णच कोरोनाबाधित सापडू लागले आहेत.

Decrease in patient number despite retention of tests | चाचण्या कायम ठेवूनही रुग्णसंख्येत घट

चाचण्या कायम ठेवूनही रुग्णसंख्येत घट

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्हिटीमध्ये घसरण : दिवसाला जिल्ह्यात होतात सुमारे पंधरा हजार संशयितांच्या तपासण्या

नाशिक : एप्रिल महिन्यात कमालीचा पॉझिटिव्हिटी दर गाठलेल्या कोरोनाने अचानक वाढलेली रुग्णसंख्या व त्या प्रमाणात होत असलेले मृत्यू पाहता, सदरची लाट आटोक्यात येण्याबाबत व्यक्त होणाऱ्या शंकांना आता पूर्णविराम मिळण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. सरासरी दररोज १५ हजार संशयित रुग्णांची चाचणी केली असता त्यातून दोन ते अडीच हजार रुग्णच कोरोनाबाधित सापडू लागले आहेत.  दोन आठवड्यांपूर्वी हेच प्रमाण तीन ते साडेतीन हजारांच्या आसपास इतके होते.     शासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना व आरोग्य खात्याच्या प्रयत्नांबराेबरच शहरासह ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाविषयी दाखविलेल्या सजगतेमुळेच हे शक्य झाले असून, त्यातही जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या पातळीवर गावोगावी राबविलेल्या मार्गदर्शक योजनांचा यात अधिक समावेश आहे. आजही कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी, एप्रिल महिन्याच्या तुलनेत त्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. 
पॉझिटिव्हिटीही झाली कमी 
१ मे रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के इतका होता. त्यात आरटीपीसीआरने करण्यात आलेल्या चाचणीचा १८.१७ तर रॅपिड अँटिजन चाचणीचा २५.४९ इतका होता. मात्र १३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर घसरून १५.८२ वर येऊन स्थिरावला आहे. त्यातही नाशिक महापालिका हद्दीत कारोनाबाधितांचे प्रमाण ११ टक्के तर ग्रामीण भागात २५ टक्के इतके आहे.
नाशिक शहरापेक्षा मालेगावी चाचण्या कमी
१ ते १३ मे यादरम्यान कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून, संशयितांच्या चाचण्यांची संख्या मात्र कायम आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने दररोज साधारणत: साडेआठ ते नऊ हजार तर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात दररोज पाच ते साडेपाच हजार नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यामानाने मालेगाव महापालिकेत बोटावर मोजण्याइतपत दोन आकडी संख्येतच चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये १ मे रोजी एकूण १३,८६८ लोकांच्या चाचणीमागे ३,४१२ बाधित रुग्ण सापडले होते.
१२ लाख चाचणी
वर्षभरात   ३० एप्रिल अखेर जिल्ह्यात एकूण १२ लाख १२ हजार ३०६ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ लाख २७ हजार ३७६ कोरोनाबाधित रुग्ण 
सापडले. कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचा दर २७ टक्के इतका होता. 

Web Title: Decrease in patient number despite retention of tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.