डुबेरे विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:52 PM2020-06-25T16:52:45+5:302020-06-25T16:53:17+5:30
सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगरपालिका शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले.
सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगरपालिका शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे , खजिनदार बबनराव वाजे ,मनीष गुजराथी , आर्किटेक्चर जितेंद्र जगताप ,कॉन्ट्रॅक्टर सोपान परदेशी ,डॉक्टर विजय लोहरकर ,संजय सानप , रामनाथ पावसे , तेजस्विनी वाजे ,डॉक्टर सुजाता लोहारकर ,संगीता कटयारे,शिल्पा गुजराथी , प्राचार्य सोपान येवले आदी उपस्थित होते .
जलकुंभामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे . विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे .विद्यार्थ्यांना चांगले शुद्ध स्वरूपात पाणी मिळणार आहे . विद्यार्थ्यांची तहान भागणार आहे. जलकुंभ बांधून दिल्यामुळे वारुंगसे यांनी अतिशय चांगले समाजोपयोगी काम केले आहे. त्यांचे काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार हेमंतनाना यांनी काढले.
लायन्स क्लब ऑफ़ सिन्नर सिटी तसेच स्व. रामभाऊ गोपाळा वारुंगसे व स्व. द्रोपदाबाई रामभाऊ वारुंगसे यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष पांडुरंग रामभाऊ वारुंगसे यांच्याकडून विद्यालयाला 10 हजार लिटर क्षमतेचा पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ बांधून दिला आहे. उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव वामने यांनी स्वतः च्या खर्चातून पाईप लाईन करून स्वतःच्या विहिरीचे पाणी विद्यार्थ्यांसाठी जलकुंभात उपलब्ध करून दिले. पांडुरंग वारुंगसे यांनी भविष्यात विविध शैक्षणिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. यावेळी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे खजिनदार बबनराव वाजे यांनी विद्यालयासाठी सॅनिटायझर स्टॅन्ड तसेच पांडुरंग वारुंगसे यांनी हँडवॉश उपलब्ध करून देण्याची जाहीर केले . पाईपलाईन खोदण्यासाठी रामनाथ पावसे यांनी जेसीबी मोफत उपलब्ध करन दिले.उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .विद्यालयाचे प्राचार्य सोपान येवले यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन पांडुरंग करपे यांनी तर आभार एकनाथ खैरनार यांनी मानले.यावेळी भाऊसाहेब सहाणे, सोमनाथ गिरी, मंजूश्री आहेर ,सोमनाथ पगार, राजेंद्र गांगुर्डे ,मारुती डगळे ,विजय कोकाटे, एस. बी.गुरुळे ,लिपिक आर. डी .घुमरे ,राणी शिंदे , एस. एस. बोराडे ,सुनिल पवार, किशोर शिंदे, सचिन गिते ,अनिल काळे ,रवी गोजरे, मधुकर रोडे उपस्थित होते.