सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:14 AM2018-04-23T00:14:21+5:302018-04-23T00:14:21+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत.

 Deep water shortage on Saptashringad | सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई

सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई

Next

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत. सप्तशृंगगडावर भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच सप्तशृंगगडावर पाणीटंचाईची समस्या दरवर्षी नित्याचीच झाली आहे. भवानी पाझर तलावाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच सप्तशृंगगडावरील नागरिकांना उपलब्ध नाही. ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळीपाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. यंदा एप्रिलच्या मध्यातच भवानी पाझर तलावाचे काम सुरू असल्याने तलाव कोरडाठाक झाला असून, त्यामुळे गडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम यंदा हाती घेण्यात आले असून, गळती रोखण्यासोबतच तलावातील गाळही काढला जात असल्याने पुढच्या वर्षीपासून सप्तशृंगगडावर पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत अशी अपेक्षा गडावरील नागरिक बाळगून आहेत. मात्र सध्याची भयाण परिस्थिती बघता पुढील दोन महिने पाण्याची स्थिती गंभीर राहणार असून, सप्तशृंगगडावरील पाणीटंचाईच्या दृष्टीने शासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागत आहे.
टॅँकरने पाणीपुरवठा
सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरने पाणीपुरवठा करून सप्तशृंगगड ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मदतीने देवीभक्तांची तहान भागवत आहे. सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाºया भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थ गंगा, जमुना, पंजाबी कुंडावरून पायपीट करून पाणी आणतात. गावातील तीन हातपंप, गावातील खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चैत्रोत्सव काळात ग्रामस्थ व भाविकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या टँकरने सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करण्यात आला होता व आजही चालू आहे.

Web Title:  Deep water shortage on Saptashringad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.