पाण्याअभावी मेसनखेडे शिवारात हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 01:26 AM2021-05-24T01:26:15+5:302021-05-24T01:27:48+5:30

चांदवड तालुक्यातील मेसनखेडे शिवारात पाण्याअभावी  हरणाचा मृत्यू झाला असून,  शिवारात जंगली जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. 

Deer dies in Mesankhede Shivara due to lack of water | पाण्याअभावी मेसनखेडे शिवारात हरणाचा मृत्यू

पाण्याअभावी मेसनखेडे शिवारात हरणाचा मृत्यू

Next

चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारात पाण्याअभावी  हरणाचा मृत्यू झाला असून,  शिवारात जंगली जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. 
रविवारी (दि.२३) सकाळी १० वाजेच्या सुमारास मेसनखेडे येथील शेतकरी नितीन पगार हे  शेतातील विहिरीतील पाणी काढण्यासाठी  गेले असता  विहिरीत हरिण पडल्याचे आढळून आले.  पगार यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विहिरीतून हरिण काढण्याकरिता मदतीला बोलावले; परंतु  तोपर्यंत हरणाने प्राण सोडले होते.  
ज्ञानेश्वर पगार यांनी  वन विभागीय  कार्यालय, चांदवड यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.  वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ येऊन पंचनामा करत हरिण ताब्यात घेतले. त्याचा मृत्यू पाण्याअभावी झाल्याची चर्चा होत आहे.
पाणवठे तयार करण्याची मागणी
चांदवड हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून परिचित आहे. या भागात दरवर्षी पाण्याचा प्रश्न बिकट असतो. त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ इतरत्र भटकत असतात. त्यांची भटकंती थांबविण्यासाठी जागोजागी पाणवठे तयार करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Deer dies in Mesankhede Shivara due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.