...तर राष्टÑवादाची व्याख्या चुकीची ठरते : सुभाष वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:30 AM2019-03-21T00:30:17+5:302019-03-21T00:30:51+5:30
पुरोगामी विचार बाजूला करून केवळ सनातनी विचारधारेतून या देशात राष्टÑवादाची व्याख्या केली जात असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल.
नाशिक : पुरोगामी विचार बाजूला करून केवळ सनातनी विचारधारेतून या देशात राष्टÑवादाची व्याख्या केली जात असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. देशात जेव्हा शेतकरी, शेतमजुरांसारखे घटक कष्ट उपसतात तेव्हा राष्टवाद सिद्ध होतो, असे प्रतिपादन समाजवादी अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ६३वे पुष्प वारे यांनी ‘संवैधानिक राष्टÑवाद’ या विषयावर बुधवारी (दि.२०) गुंफले. औरंगाबादकर सभागृहात बोलताना ते यावेळी म्हणाले, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्टÑामध्ये ‘राष्टÑवाद’ या शब्दाचा वापर चिथावणीसाठी होत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या पक्षाला जनतेने प्रचंड बहुमत मिळवून दिले. त्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीला सामोरे जाताना विकासाचा कोणताही मुद्दा नसावा, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकेल? असा प्रश्नही वारे यांनी यावेळी उपस्थित केला.
देशाच्या सीमांचे रक्षणासाठी सैन्यदल सक्षम असून राजकीय व्यवस्थेपासून ते लांब राहून आपले कर्तव्य बजावत आहेत; मात्र त्यांच्या धाडसी आणि शौर्यपूर्ण कामगिरीचेही भांडवल सत्ताधाऱ्यांकडून केले जाणे ही लाजिरवाणी बाब आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत देश स्वयंपूर्ण आहे, तो केवळ शेतकरी अन् शेतमजुरांच्या जिवावर. मात्र या शेतकºयाला आज कोणते दिवस सत्ताधाऱ्यांनी बघायला लावले, ते वेगळे सांगायला नको, असेही वारे म्हणाले.