नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.३०) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांत प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित पूर्ण करण्यात येते. विद्यापीठाच्या पुरवणी दीक्षांता कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून २०१८ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व दि. २९ जून २०२०पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत प्रक्रियेतून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिनियमातील निर्देशांनुसार दरवर्षी दोन वेळेस पदवी प्रदान करण्यात येते. मुख्य दिक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते जाहिरपणे पदवी प्रदान करण्यात येते तर पुरवणी दीक्षांत प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना पदवी प्रदान करण्यात येते. त्यामुसार २०१९ च्या हिवाळी सत्रात उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच २९ जून २०२० पूर्वी पीएच.डी. जाहिर झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच २०१८ हिवाळी सत्रातील इंटरर्नशिप पूर्ण झालेले सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी व फेलोशिप आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या सुमारे ११ हजार ५०० पेक्षा अधिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, पुरवणी दीक्षांत विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे संलग्नित महाविद्यालयाकडे पाठविण्यात येते. विद्यार्थ्यांनी ती संबंधित महाविद्यालयातून प्राप्त करावीत असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन नमूना अर्ज डाऊनलोड करुन २६ जून २०२०पूर्वी विद्यापीठाकडे ई-मेलव्दारा सादर करावा. मुदतीत अर्ज सादर करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहीती परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले आहे.
आरोग्य विद्यापीठाकडून पुरवणी दीक्षांत ; ११ हजार ५०० विद्यार्थ्याना पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:20 PM
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.३०) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. २०१८ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व दि. २९ जून २०२०पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत प्रक्रियेतून पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांची पुरवणी दिक्षांत प्रक्रिया कुलपतींच्या मान्यतेनंतर 11 हजार 500 विद्यार्थ्यांना पदवी