कर्मचाºयास धमकावणाºयावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:53 PM2020-09-02T22:53:56+5:302020-09-03T01:45:43+5:30

दिंडोरी / ननाशी : पंचायत समिती कर्मचाºयास वेळीअवेळी फोन करून शिवीगाळ होत असल्याचा आरोप करत मनस्ताप देणाºया शिक्षक कर्मचाºयावर कारवाई करण्याची मागणी दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for action against intimidating employees | कर्मचाºयास धमकावणाºयावर कारवाईची मागणी

पंचायत समितीच्या लिपिकाला धमकवणाऱ्या शिक्षकावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन गटशिक्षण अधिकाऱ्यांना देताना शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी भरत सातपुते, बबिता गांगुर्डे, अनिल गायकवाड, रामदास कराटे आदी.

Next
ठळक मुद्देदिंडोरी तालुका शिक्षक संघटना : समन्वय समितीचे गटशिक्षणाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी / ननाशी : पंचायत समिती कर्मचाºयास वेळीअवेळी फोन करून शिवीगाळ होत असल्याचा आरोप करत मनस्ताप देणाºया शिक्षक कर्मचाºयावर कारवाई करण्याची मागणी दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दिंडोरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील लिपीक बी. बी. झिरवाळ यांना जाधवनामक शिक्षकाने वैद्यकीय बिलाच्या कामासंदर्भात फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यावेळी आदिवासी शिक्षक संघटनेचे भरत सातपुते, बबिता गांगुर्डे, अनिल गायकवाड, रामदास कराटे, शांताराम गवळी, मारुती कुंदे, शिक्षक समितीचे परदेशी, केंद्रप्रमुख संघटनेचे राजेंद्र गांगुर्डे, शिक्षक संघाचे सचिन वडजे, योगेश बच्छाव, शिक्षक परिषदेचे रावसाहेब जाधव, समता शिक्षक परिषदेचे प्रल्हाद पवार, अपंग संघटनेचे नितीन देवरे, पदवीधर संघटनेचे जयदीप गायकवाड, शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, सरचिटणीस व पदाधिकारी उपस्थित होते.समितीतर्फे निषेध, कायदेशीर कारवाई कराया प्रकरणी सदर शिक्षकाचा दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. अशा अपप्रवुत्तीला तालुक्यातील शिक्षक संघटना पाठीशी घालणार नाही असेही या निवेदनात नमूद केले आहे. संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी समन्वय समितीने संबधित यंत्रणेला निवेदन दिले.

Web Title: Demand for action against intimidating employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.