नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 10:54 PM2020-07-07T22:54:20+5:302020-07-07T22:54:32+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून, त्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणास मनाई करण्यात आलेली आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून, त्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणास मनाई करण्यात आलेली आहे. टीव्ही व रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम दाखवावेत, ऐकवावेत असे निर्देश देऊनही शहरातील शाळांमध्ये मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन वर्ग घेत असल्याने संबंधित शाळांवर कारवाई करण्याची माहणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक यांनाही निवेदन दिले आहे.
तसेच संबंधित शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही युवासेनेचे जिल्हाचिटणीस गणेश बर्वे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी उपमहानगर प्रमुख निशांत अवसरकर, किरण पाटील, संदेश लवटे, आकाश उगले, आदित्य बोरस्ते, बालम शिरसाठ, रूपेश पालकर आदी उपस्थित होते.