केंद्रीय मंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:43+5:302021-09-02T04:31:43+5:30
पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा झाली. त्यात मनपाच्या हेडगेवार ...
पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा झाली. त्यात मनपाच्या हेडगेवार चौक येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणाचे २० हजार डोस पूर्ण झाले म्हणून भाजपच्या नगरसेवक भाग्यश्री ढोमसे व त्यांचे पती भाजपा पदाधिकारी राकेश ढोमसे यांनी गाजावाजा करीत थेट केंद्रीय मंत्री भरती पवार यांना मनपाच्या लसीकरण केंद्रावर बोलावत हेडगेवार चौक येथील केंद्रावर २० हजार डोस पूर्ण केल्याचे जाहीर केले. यामुळे मंत्री पवार यांनी ढोमसे दाम्पत्याचे कौतुकही केले. पण प्रत्क्षत यासंदर्भात शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेतली असता, सदर आकडा खोटा असल्याचे प्रभागच्या सभेत सिद्ध झाले. ज्याची चुकी असेल त्याच्यावर कारवाई करावी तसेच प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर बोर्ड लिहून रोजच्या उपलब्ध लसी याची माहिती लिहावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळीं विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष भरत पाटील, धोंडीराम बोडके, युवक अध्यक्ष इम्रान अन्सारी, कार्याध्यक्ष देवेंद्र देशपांडे, महासचिव नीतेश निकम, सचिनभाऊ गायकवाड, सूरज चव्हाण, बादशाह खान, मनोज साठे, विजय सोनवणे, सिद्धार्थ मोरे आदी उपस्थित होते. (फोटो ०१ सिडको)
फोटो ओळी
लसीकरणाचे खोटे आकडे जाहीर करून जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, याबाबतचे निवेदन देताना विजय पाटील, भरत पाटील, धोंडीराम बोडके आदी.