शासकीय रु ग्णवाहिकेवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ महिलांना अटक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:59 PM2018-09-27T16:59:54+5:302018-09-27T17:02:20+5:30

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी रूग्णांना नाशिक येथे दाखल करण्यासाठी घेऊन जाणा-या शासकीय रु ग्णवाहिकेच्या चालकासह रु ग्णांच्या नातेवाईकांना मारहाण करून जखमी करणा-या महिलांना तत्काळ अटक करावी अशी मागणी पेठ तालुक्यातील सर्वपक्षीय आदिवासी बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 The demand for arresting those 'women' who attacked the government-run couples | शासकीय रु ग्णवाहिकेवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ महिलांना अटक करण्याची मागणी

शासकीय रु ग्णवाहिकेवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ महिलांना अटक करण्याची मागणी

Next

पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आदिवासी रु ग्णांच्या सेवेसाठी असलेल्या १०८ रूग्णवाहिकेतून गंभीर आजारी रु ग्णांना नाशिक येथे नेण्यात येत होते. सदर वाहनाला अडवून नाशिकच्या दोन महिलांनी चालकाला व रूग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. रूग्णाच्या नातेवाईकांनी विनंती करूनही त्या महिलांचा धिंगाणा सुरूच होता. आदिवासी समाजातील जनतेला अपशब्द वापरून मारहाण करणा-या या दोन्ही महिलांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शामराव गावित ,किरण भुसारे ,मोहन कामडी, कुमार मोंढे, पुष्कर गांगोडे, गणेश गावित, सुरेश पवार, नामदेव वाघेरे, ललित शिंगाडे, किरण वार्डे आदींच्या सह्या आहेत.

Web Title:  The demand for arresting those 'women' who attacked the government-run couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.