भारनियमन रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:33 AM2019-06-05T00:33:07+5:302019-06-05T00:34:45+5:30

पेठ : एकीकडे वाढत्या उष्णतेने जनावरांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असताना वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे पिके वाचविणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

The demand for cancellation of the restriction | भारनियमन रद्द करण्याची मागणी

भारनियमन रद्द करण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देविजेचा वापर कमी असल्याने भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा.

पेठ : एकीकडे वाढत्या उष्णतेने जनावरांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असताना वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे पिके वाचविणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पेठ तालुक्याच्या भौगोलिक रचनेनुसार उंच भागात दुष्काळ तर खोल दरीत किंवा धरण क्षेत्रात बºयापैकी पाणी असल्याचे दिसून येते. अशा ठिकाणी शेतकरी थोड्याफार प्रमाणात उन्हाळी पिके घेतात. मात्र वीज वितरण कंपनीच्या दिवसभराच्या भारनियमनामुळे रात्री-अपरात्री पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी देण्यासाठी अंधारात चाचपडावे लागत आहे. दिवसभर लाईट नसल्याने गावांनाही पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. पेठ तालुक्यात तसाही विजेचा वापर कमी असल्याने भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा.





, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The demand for cancellation of the restriction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.