येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होत आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने भरमसाठ बिले येतात. शाळांनी बिले भरली नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा करावा, अशी मागणी येथील पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.भरमसाठ बिल येत असल्याने येवला तालुक्यातील १३ शाळांनी बिल न भरल्याने वीज कंपनीने वीजपुरवठा थांबविला आहे. तसेच तालुक्यातील बाकी ४० शाळांचे एकूण वीजबिल १ लाख २४ हजार ४१० रु पये असून, ते बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शासन निर्णय होऊनदेखील प्राथमिक शाळांना घरगुती दराने वीज आकारली जात नाही. येवला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण सतरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये २२३ शाळा ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून डिजिटल व सेमी इंग्रजी झाल्या आहे; परंतु आता दिलेले संगणक शाळांना वीज नसल्यामुळे वापरता येणार नाही.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांना निवेदन देताना पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड.
शाळांना घरगुती दराने वीजपुरवठ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:26 AM
येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होत आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने भरमसाठ बिले येतात. शाळांनी बिले भरली नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा करावा, अशी मागणी येथील पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देभरमसाठ बिल येत असल्याने येवला तालुक्यातील १३ शाळांनी बिल न भरल्याने वीज कंपनीने वीजपुरवठा थांबविला आहे.