नळांना तोट्या बसविणे सक्तीचे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:43+5:302021-07-07T04:16:43+5:30
सिन्नर : शहर व उपनगरात अनेक नागरिकांच्या नळांना तोट्या बसविल्या नसल्याने पाणी वाया जाते. नागरिकांनी नळांना तोट्या न बसवल्यास ...
सिन्नर : शहर व उपनगरात अनेक नागरिकांच्या नळांना तोट्या बसविल्या नसल्याने पाणी वाया जाते. नागरिकांनी नळांना तोट्या न बसवल्यास नगरपरिषदेने स्वखर्चातून तोट्या बसवून त्याचा खर्च पाणी देयकाद्वारे वसूल करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी केली आहे.
याबाबत मागणीचे निवेदन मुख्याधिकारी संजय केदार यांना देण्यात आले आहे. रोज पाणीपुरवठा होत असल्याने बऱ्याच ठिकाणी नागरिक पाणी वाया घालवत आहेत. तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळेही पाणी वाया जाते. पाणी वाया घालवणे अतिशय गंभीर असून नळधारकांना तोट्या बसविण्याचे आदेश करण्यात यावेत. नळांना तोट्या बसविण्याबाबत नागरिकांत जनजागृती करण्यात यावी. पाणी वाया न जाण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष उगले यांनी केली आहे.
इन्फो...
पाण्याच्या वेळांची माहिती द्यावी
काही दिवसांपासून नगरपरिषदेतर्फे शहर व उपनगरात दररोज पाणी वितरण केले जात आहे. पाणी एकाच वेळी येत नसल्याने पाणी केव्हा येते याची माहिती काहींना होत नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या कामगारांनी नागरिकांसाठी व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून पाणी येण्या-जाण्यासंदर्भात माहिती द्यावी.