ठळक मुद्देराजापूर : पिक विमा भरण्यास मूदत वाढ देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 31 जूलै रोजी पिक विमा भरण्याची शेवटची तारीख होती. शेवटचे दोन दिवस शेतकर्यांना पिकविमा भरण्यासाठी आॅनलाईन प्रक्रि या वारंवार बंद पडत होती. त्यामुळे बरेच शेतकरी पिक विमा योजने
राजापूर : पिक विमा भरण्यास मूदत वाढ देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 31 जूलै रोजी पिक विमा भरण्याची शेवटची तारीख होती. शेवटचे दोन दिवस शेतकर्यांना पिकविमा भरण्यासाठी आॅनलाईन प्रक्रि या वारंवार बंद पडत होती. त्यामुळे बरेच शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहीले आहेत. सध्या शेतकर्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करत असतांना दररोज पडणार्या पावसाने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्याने पिके खराब होण्याची वेळ शेतकर्यांवर आली असल्याने, शासनाने पिकविमा भरण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.