घरपोहोच गॅससाठी जादा पैशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 10:40 PM2021-06-20T22:40:45+5:302021-06-21T00:41:08+5:30
येवला : शहरात गॅस सिलिंडर वितरण करणार्या वाहनचालकांकडून सिलिंडर घरपोहोच करताना जादा पैसे घेतले जात असल्याची तक्रार शहरातील काही ग्राहकांनी तहसरलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
येवला : शहरात गॅस सिलिंडर वितरण करणार्या वाहनचालकांकडून सिलिंडर घरपोहोच करताना जादा पैसे घेतले जात असल्याची तक्रार शहरातील काही ग्राहकांनी तहसरलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील मिल्लतनगर भागातील एका वितरकाच्या वाहनचालकाकडून गॅस सिलिंडरच्या निर्धारीत बिलाव्यतिरिक्त वीस ते तीस रुपये जादा घेतले जातात. जादा पैसे न दिल्यास गॅस सिलिंडर परत नेले जाते. गॅस कंपनी व सरकारी नियमानुसार गॅस टाकीचे बिल घरपोहोच वितरणासह असताना जादा पैसे मागणे, सक्तीने घेणे अन्यायकारक आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर आजम अन्सारी, इरफान मलंग, मन्सुर महेवी, मुश्ताक अन्सारी, रफीक अन्सारी यांच्यासह गॅस ग्राहकांच्या स्वाक्षर्या आहेत.