आदिवासी आश्रमशाळा शाळेतील अधीक्षकांना सातवा वेतन आयोग लागू कराण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:11 PM2020-06-29T18:11:38+5:302020-06-29T18:11:38+5:30

औंदाणे : राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अनुदानित शासकीय आश्रमशाळा ...

Demand for implementation of 7th pay commission for tribal ashram school superintendents | आदिवासी आश्रमशाळा शाळेतील अधीक्षकांना सातवा वेतन आयोग लागू कराण्याची मागणी

आदिवासी आश्रमशाळा शाळेतील अधीक्षकांना सातवा वेतन आयोग लागू कराण्याची मागणी

Next
ठळक मुद्देसातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी एकमेव अधीक्षक यांना वंचित ठेवून केली.

औंदाणे : राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अनुदानित शासकीय आश्रमशाळा अधीक्षक संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील अधीक्षक, स्री अधीक्षकांना वगळून शासनाने अनुदानित आश्रमशाळा २०१८ प्रपत्र क्र मांक १४५, ११, १८, ९, २०१९ आदेशाने सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी एकमेव अधीक्षक यांना वंचित ठेवून केली. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
शासनाने अन्याय केला असून, अधीक्षक शिक्षकांचे वेतन घेत आलेले आहेत. सहावा वेतन आयोगाचा आधार घेत सातवा वेतन आयोगातील ५२ ००-२०२००- ग्रेड पे २८०० टप्पा प्रमाणे लागू करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर राज्याध्यक्ष उमेश करणार, राज्य सचिव किरण जोशी, मनोहर कदम यांच्या सह्या आहेत.

(फोटो २९ औंदाणे)
राज्यातील अनुदानित आश्रमशाळा अधीक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करावा याबाबतचे नियोजन कृषिमंत्री दादा भुसे यांना देताना राज्य सचिव किरण जोशी व मनोहर कदम.

Web Title: Demand for implementation of 7th pay commission for tribal ashram school superintendents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.