येवला : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करावा, अशी मागणी येवला तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना हे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना, न्या. एम. जी. गायकवाड राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल यांचा संदर्भ घेऊन मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने सदर निवेदनात करण्यात आली आहे.न्या. एम. जी. गायकवाड आयोगाने सर्व तपासणी करून आपला अहवाल शासनाला सादर केला असल्याने व त्या अहवालात मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे मराठा समाज राज्यघटनेच्या कलम ३४० मधील आरक्षणास पात्र ठरला आहे. या पार्श्वभूमीवर न्या. गायकवाड अहवालातील शिफारशी मान्य करून मराठा समाजाचा सरसकट समावेश राज्यातील अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षण यादीत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर येवला तालुका अध्यक्ष बाजीराव सोनवणे, बाळासाहेब सोमासे, आनंदा बर्शीले, प्रमोद देवडे, माधव इंगळे, शिवाजी साताळकर, किरण जाधव, जयराम नळे, दत्ता भोरकडे, संदीप गटकळ, शंकर लांडगे, शिवाजी सावंत, संजय हिरे, नितीन अिहरे, सुरेंद्र ढोकणे, विजय मुंगसे, कृष्णा गरु डे, विजय गायकवाड, दिनकर दाणे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.