लोकमत न्यूज नेटवर्कअलंगुण : सुरगाणा तालुक्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबामध्ये करावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सुमारे दहा हजार व्यक्तींचा समावेश अंत्योदय प्राधान्य कुटुंबामध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करून रेशनिंग धान्याचा लाभ देण्यात यावा. आदिवासी भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसल्याने जनतेची उपासमार होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या परिस्थितीत गोरगरिबांची मजुरीविना होणारी उपासमार टाळावी. यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंबाचा लाभ देण्यासाठी याची कायर्वाही तात्काळ प्रभावाने करावी, अशी मागणी केली आहे.यावेळी सरपंच मेनका पवार, भारती चौधरी, रतन चौधरी, योगेश जाधव, अशोक धूम, त्र्यंबक ठेपणे, देवीदास हाडळ, राहुल गवळी, नितीन पवार, पोलीसपाटील परशराम चौधरी आदींनी निवेदनातून मागणी केली आहे.
केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबात करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:28 PM
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबामध्ये करावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसल्याने जनतेची उपासमार