दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा होणारच असल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरूच ठेवलेले होते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिक्षण घेण्यात अडचणींचा सामोरे जावे लागले. ग्रामीण भागातील मोबाइल नेटवर्क प्रॉब्लेम, त्यातच आधी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गांकडे अँड्रॉईड मोबाइलचा अभाव आणि नियमित शेती कामे यांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमध्ये जॉईन होणे अवघड होत होते. मार्चपासून सुरू होत असलेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थी यांनीही ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष ऑफलाइन अध्यापनालाच पसंती दिली आहे. त्यासाठी महाविद्यालयात जाण्याची इच्छा आहे पण जाण्याची सोय नसल्याने अडचण होत आहे.
खेडलेझुंगे, रुई, कोळगाव, कानळद, धारणगाव वीर व खडक, सारोळेथडी या गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे लासलगाव, विंचूर व निफाडसारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी नियमित ये-जा करीत असतात. लॉकडाऊनच्याआधी परिसरातून एसटीच्या ६ फेऱ्या व्हायच्या. सध्या लॉकडाऊन संपुष्टात येऊनही परिसरात एसटीच्या फक्त दोनच फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्या फेऱ्या सकाळी ९ आणि सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास असल्याने विद्यार्थी, शेतकरी यांच्या सोयीनुसार नाहीत.
लासलगाव- नैताळे- खेडलेझुंगे या मार्गावरुन सध्या सुरू असलेल्या २ फेऱ्यांऐवजी पूर्वीप्रमाणे बसेसच्या ६ फेऱ्या करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.
सकाळी ९ च्या बसने मुले लासलगाव, विंचूर, निफाड, नाशिक येथे शिक्षणासाठी गेल्यास त्यांना घरी येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच शाळा, महाविद्यालये सकाळी ८ पर्यंत सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची सांगड घालून बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी पालकवर्गाने केली आहे.
===Photopath===
040221\04nsk_17_04022021_13.jpg
===Caption===
बस