त्र्यंबकच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:46 PM2020-09-02T22:46:01+5:302020-09-03T01:45:03+5:30

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी एप्रिल-मेपासून त्र्यंबककरांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत असते. सध्या त्र्यंबकला अहिल्या व अंबोली धरण आणि गत सिंहस्थात बेझे धरणात केवळ दहा टक्के आरक्षणातून पाणी मिळते. तरीही त्र्यंबकेश्वरला दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. त्यापार्श्वभूमीवर किकवी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Demand for increase in Trimbak's drinking water reservation | त्र्यंबकच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविण्याची मागणी

त्र्यंबकच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यात मोठा प्रकल्प राबविण्यात यावा अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी एप्रिल-मेपासून त्र्यंबककरांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत असते. सध्या त्र्यंबकला अहिल्या व अंबोली धरण आणि गत सिंहस्थात बेझे धरणात केवळ दहा टक्के आरक्षणातून पाणी मिळते. तरीही त्र्यंबकेश्वरला दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. त्यापार्श्वभूमीवर किकवी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरवर्षी त्र्यंबकेश्वरची लोकसंख्या वाढत आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार साधारणपणे साडेबारा हजार लोकसंख्या आहे. तीर्थक्षेत्र म्हणून व पर्यटनस्थळ असल्याने नागरिकांची गर्दी होते. पालिकेचे पूर्वीचे क्षेत्रफळ १.८९ चौ. किमीवरून आता ११.७८ चौ. किमी झाले आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याची गरज वाढणारच आहे. तीर्थक्षेत्र असल्याने दररोज येणारा २५ ते ३० हजार भाविकांची संख्या, तर महिन्यातील दोन एकादशीला भाविकांची संख्या वाढतच आहे. यासाठी तालुक्यात मोठा प्रकल्प राबविण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Demand for increase in Trimbak's drinking water reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.