खरीप धोक्यात कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 10:36 PM2021-08-18T22:36:56+5:302021-08-18T22:37:45+5:30

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.

Demand for release of bitter kharif cycle | खरीप धोक्यात कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी

भेंडाळी परिसरातील पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला कडवा कॅनॉल.

googlenewsNext
ठळक मुद्देसायखेडा : निम्मा पावसाळा होऊन गेला तरी नदीनाले अध्याप कोरडे ठाक

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.

या परिसरात असलेली नद्या-नाले, ओहळ, विहिरी कोरडे ठाक पडले आहे, त्यामुळे या परिसराला जीवनदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री व दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे भेंडाळीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब कमानकर, ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल यांच्यासह निवेदन दिले आहे.
कडवा कॅनॉलच्या लाभार्थी क्षेत्रात सद्या खरीप पिके धोक्यात आली आहे. पिके कोमेजून जात आहेत. शेतकऱ्यांनी हजारो रुपये भांडवल खर्च करुन शेतात पिके उभी केली आहे, मात्र आज कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. कर्ज काढून शेतकऱ्यांनी भांडवल उभे केले ते पूर्ण पिकांसाठी खर्च केले, आज मात्र डोळ्यासमोर पिके करपू लागली आहेत. भविष्यात पाऊस होईल की नाही हि शंका आहे, त्यामुळे रब्बीची शाश्वती नाही. आत्ता केवळ खरीप पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे, मात्र ती सुकून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

धरण क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे. धरण जवळपास ऐंशी टक्के भरले आहे. पिण्याच्या पाण्याचा आरक्षित कोठा तसाच ठेऊन उर्वरित पाणी सोडावे अशी मागणी मेलद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.
त्यामुळे खरीपाचे पिक वाचविण्याकरीता कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल, सोमनाथ खालकर, गणेश शिंदे, जयवंत सातपुते, संतोष खालकर, मधुकर आढाव, बाळासाहेब खालकर, शशिकांत खालकर, कांतीलाल खालकर, संदीप सातपुते, ज्ञानेश्वर सातपुते, दिपक शिंदे, बबन कमानकर, शरद शिंदे, विलास शिंदे, छगन शिंदे, रवींद्र शिंदे , सागर खालकर, गोकुळ खालकर, संतोष कमानकर, बबन शिंदे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Demand for release of bitter kharif cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.