मानोरी : येवला तालुक्यात महिनाभरापासून उष्णतेचा पारा वाढला असून ग्रामीण भागातील शेतशिवारातील विहिरींतील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने पाण्याची कमतरता भासू नये याकरीता पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी केला जात आहे.उन्हाळ कांद्याला देण्यासाठी विहिरींना पाणी नसल्याने पाण्या अभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. उन्हाळ कांद्याना अद्यापही तीन ते चार मुबलक पाण्यांची गरज असून येवला तालुक्यात पालखेड कालव्यातून आवर्तन सुरु आहे. या आवर्तनामधून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड येथील गोई नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून वितरिका क्रमांक २१ , २५ आणि २८ देखील पालखेड आवर्तनातून पाणी तात्काळ सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 10:20 PM
मानोरी : येवला तालुक्यात महिनाभरापासून उष्णतेचा पारा वाढला असून ग्रामीण भागातील शेतशिवारातील विहिरींतील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने पाण्याची कमतरता भासू नये याकरीता पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी केला जात आह
ठळक मुद्देपाण्या अभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ