पेठ : तालुक्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारचा माल व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जात असून, अशा उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी पेठ शहरात स्टॉल अथवा व्यावसायिक छत्र्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिला मंडळाने तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांची भेट घेऊन चर्चा केली. पेठ तालुक्यात जंगल संपत्ती अजूनही अबाधित असल्याने महिला बचत गट निरगुडी तेल, मशरूम, विविध प्रकारचे लोणचे यासह बांबूपासून वस्तू तयार करतात. अशा उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी विभागाच्या योजनेतून शहरात स्टॉल मिळावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी कृषी व बचत गट मार्गदर्शक महेश टोपले तसेच तालुक्यातील महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या.