चांदवड : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऊसवाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप गौड यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी चांदवड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.डॉ. गौड यांनी परप्रांतीय मजुरांना वैद्यकीय दाखला देण्यासाठी टाळाटाळ करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. लॉकडाउनच्या काळात त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगूनही परप्रांतीय मजुरांना सदर डॉक्टरांनी दाखला दिला नाही.हा प्रकार भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे यांना समजल्याने त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेटघेतली. तसेच संबंधित डॉक्टराच्या निलंबनाची मागणी केली.यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष शांताराम भवर, वर्धमान पांडे, शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मुकेश आहेर, महेश खंदारे, कासीफ पठाण, कमलेश लव्हारे, शुभम घुले आदी उपस्थित होते.पीडित मजुरांनी तालुक्यातील काही नागरिकांना पैशांच्या मागणीची घटना सांगितली. त्या नागरिकांनी पैसे मागण्याचा व्हिडीओ तयार करून तो संबंधित अधिकाºयांना दाखविला आहे. सदर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिंला कर्मचाºयांशी नेहमीच असभ्य वर्तणूक करतात, वारंवार रु ग्णांना व कर्मचाºयांना त्रास देतात. यापूर्वीही त्यांच्यावर महिला कर्मचाºयांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना तत्काळ निलंबीत करावे, अशी मागणी गटविकास अधिकारी पाटील यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
उसवाडच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:43 PM