निफाड : दुधाचे दर वाढवून द्यावे यासह इतर मागण्यांसाठी निफाड तालुका भाजप, रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्र ांती संघटना, महायुतीच्या वतीने शनिवारी (दि. १) शांतीनगर त्रिफुलीवर महाएल्गार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचा शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. सरकारने दुधाला प्रतिलिटर ३० रु पये दर द्यावा, गायीच्या दुधाला सरसकट १० रु पये, तर दूध भुकटीला निर्यातीसाठी ५० रु पये अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवनाथ जाधव, वैकुंठ पाटील, संजय वाबळे, लक्ष्मण निकम, संजय गाजरे, संदीप अभंग, ललित कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. (अधिक वृत्त व छायाचित्रे पान : २)लासलगावी दूध दरवाढीच्या मागणीसाठी येथे भाजपाच्या वतीने राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत दूध रस्त्यावर ओतून देत आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, डी. के. जगताप, संतोष पलोड, प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, योगेश पाटील, डॉ. रमेश सालगुडे उपस्थित होते.सटाण्यात राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर १० रु पये अनुदान या मागणीसाठी शनिवारी (दि.१) आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देऊन दूध एल्गार आंदोलन छेडले. दरम्यान, उपस्थित शासकीय कर्मचाऱ्यांना गायीचे दूध वाटून गांधीगिरीही करण्यात आली.