प्रभागातील सर्व नागरिकांना लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:06+5:302021-04-18T04:14:06+5:30
रोजच्या रोज लसीकरण केंद्रावर होणाऱ्या नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊन संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने ...
रोजच्या रोज लसीकरण केंद्रावर होणाऱ्या नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊन संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने प्रभाग ३ मध्ये १८ वर्षांपुढील तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे.
पंचवटी मनपा नागरी आरोग्य तपासणी केंद्र व काही ठिकाणी प्रशासनाने लसीकरण केंद्र सुरू केले आहे. परिसरात नागरिक संख्या मोठी असून लस घेण्यासाठी नागरिक काही ठरावीक केंद्रांवर मोठी गर्दी करतात. परिणामी कोरोना साखळी अधिक घट्ट होत चालल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मनपा प्रशासनाने प्रभागातील सर्व जेष्ठ नागरिकांना व १८ वर्षांच्या पुढील सर्वांना घरोघरी जाऊन लसीकरण करणारे पथक नेमल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टळेल. मनपाने प्रभाग ३ मध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मनुष्यबळ, रुग्णवाहिका, लस, साधन साहित्य, उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही केली आहे.