नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने कडवा कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी ब्राम्हणवाडे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.नायगाव खोऱ्याता गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील सर्वच पाण्याचे स्त्रोत गेल्या काही दिवसांपासून कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे नायगाव खोºयातील ब्राम्हणवाडे, सोनगिरी, नायगावसह निफाड तालुक्यातील सावळी व पिंपळगाव आदी गावात गेल्या महिनाभरापासुन शेती पाठोपाठ पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.ब्राम्हणवाडेसह कडवा कालव्या लगतच्या गावात निर्माण झालेली व पुढील दोन महिन्याची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी कडवा कालव्याचे आधिकारी व लोकप्रतीनिधीनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन कडवा कालव्याला आठवडाभरात कमीतकमी दहा दिवसांचे आवर्तन सोडण्याची मागणी सरपंच मंगला घुगे, उपसरपंच सुनिल गिते, देवराम गिते, कैलास गिते, कचेश्वर गिते, विलास गिते, खंडु गिते, भास्कर गिते, छबू गिते, दिलीप नागरे, पोपट माळी आदी ग्रामस्थांनी केली आहे.
कडवा कालव्याला आवर्तन सोडण्याची ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 5:38 PM