भ्रमणध्वनी मनोऱ्याचे काम थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 01:20 PM2020-03-20T13:20:26+5:302020-03-20T13:20:33+5:30
कळवण :कळवण शहरातील गणेशनगर भागातील पुंजाराम पाटील कॉलनी परिसरात खाजगी भ्रमणध्वनीच्या मनोरा उभारणीचे काम सुरु आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन काम बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हे काम न थांबल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कळवणचे माजी सरपंच एकनाथ जगतापसह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
रहिवाशी भागात भ्रमणध्वनी मनोºयाच्या लहरींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. आण ित्याचा परिणाम वृद्ध, गरोदर महिला व लहान मुलांवर होतो. त्यामुळे या भागात भ्रमणध्वनी मनोरा नको अशी भूमिका घेतली आहे. मात्र नगर पंचायतची कुठलीही परवानगी न घेता शहरातील गणेशनगर भागातील पुंजाराम पाटील कॉलनीत खाजगी कंपनीचा मोबाईल मनोरा उभारणीचे काम जोरात सुरु आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे हरकत घेतली आहे. त्यानुसार नगरपंचायतीने संबंधितताना नोटीसही पाठवली आहे. मात्र स्थानिक नागरिक व नगर पंचायत यांच्या विरोधास न जुमानता संबंधित ठेकेदाराने दांडगाई करीत काम सुरूच ठेवले आहे. संबंधित ठेकेदार नगर पंचायतीच्या अधिकार्यांचेही ऐकत नसल्याने दाद मागायची कोणाकडे असा यक्ष प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर पडला आहे. हे काम तात्काळ थांबवावे अन्यथा नगर पंचायती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
संबंधित भ्रमणध्वनी मनोर्याच्या कामाबाबत आमच्याकडे स्थानिक नागरिकांची तक्र ार आली आहे. त्यानुसार आमचे कर्मचारी स्थानिक ठिकाणी जाऊन काम बंद करण्यासंबधीत नोटीस देऊन आले आहेत. काम बंद करण्यास सांगितले आहे. काम करण्यास कुठलीही परवानगी देण्यात आलेले नाही . तरी सदर ठेकेदाराने काम सुरु सूर ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .
-सचिन माने ,
मुख्याधिकारी, कळवण -----------------आमच्या घरा शेजारी खाजगी भ्रमणध्वनी कंपनीचा मनोरा उभारणीचे काम सुरु आहे. त्यास आमचा विरोध आहे. या मनोर्याच्या कामास नगर पंचायत प्रशासनाने परवानगी देऊ नये . तसे न झाल्यास नगर पंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करून आमरण उपोषण करण्यात येईल. -एकनाथ जगताप,
माजी सरपंच, कळवण -