येवला : अनुसूचित जमाती मध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, या मागणीसाठी एकलव्य संघटनेने येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शासनाने आदिवासी समाजाशिवाय इतर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ देऊ नये अशी मागणी तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांपासून धनगर तसेच इतर अनेक जाती अनुसूचित जमातीत समावेश व्हावा, अशी मागणी करत आहे. अनुसूचित जमातींना 7 टक्के आरक्षण असून यात समावेश व्हावा ही मागणीच घटनाबाह्य आहे. यात धनगर समाज आघाडीवर असून धनगर समाज हा राजकीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांची मागणी चुकीची असल्याचे अनेक अभ्यासगटांनी म्हटले आहे. आदिवासी परंपरा व धनगर समुदायाच्या परंपरा यात मूलभूत फरक आहे. उत्तर भारतीय धनगड जातीच्या नामसाधर्म्याचा फायदा घेऊन आदिवासी अनुसूचित असल्याचा दावा केला जातो तो चुकीचा असून धनगड हि वेगळी जमात आहे त्यांचा व धनगर समाजाचा कोणताही संबध नाही, असे सदर निवेदनात म्हटले आहे.आर्थिक व राजकीयदृष्ट्या संघटीत असल्याने धनगर समाजाचे काही नेते आदिवासींच्या आरक्षणावर डोळा ठेऊन स्वत:च्या समाजाची फसवणूक करत आहेत. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागला असून अजूनही अनेक समस्या या समाजाला भेडसावत आहेत. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम पवार, युवा अध्यक्ष बाबा पवार, मारु ती मोरे, सोमनाथ पवार, साईनाथ मोरे, रावसाहेब सुरासे, विजय माळी यांच्यासह पदाधिकारी- कार्यक र्त्यांच्या स्वाक्षर्?या आहेत.
येवल्यात एकलव्य संघटनेचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:10 PM
येवला : अनुसूचित जमाती मध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, या मागणीसाठी एकलव्य संघटनेने येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शासनाने आदिवासी समाजाशिवाय इतर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ देऊ नये अशी मागणी तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअनुसूचित जमातीत धनगर समाजाला स्थान न देण्याची मागणी